Friday, October 12, 2012

since the day you left

life is so down,
   all sadness have grown.
all cheers & joys got theft
   since the day you left.

my tearsome eyes,
  shed no more tears.
they search someone around
  with an unreasonable fear.

my lips are mum.
  they have no emotions.
they refuse to push a smile
  theres neither an excuse nor a reason.

each moment of day
  is getting stretched like forever.
those memories haunt me
  like leaving me for never.

that day, my lips never moved
   my eyes didn't uttered
nor my heart spoke
  that you leaving mattered.

I had so many things to say
  I planned so many things to do.
you didn't allowed me a chance
  & I kept standing, staring at you.

there, at that moment,
  a tear rolled out of my eye.
Just when you left, silently
  to say you Good Bye.

---- parinita (29/2/2009)


Friday, September 14, 2012

मन रम्य

तुझ्यात मन रमले रे
तुझ्याच रंगात रंगले रे
डोळ्यांत आणि बुडले रे
तुझ्याच प्रेमात पडले रे

नाही भान स्वतःची
आठवण तुझी दिवस-रात्री
तुझ्यात हरवूनी अशी
मनाचे भाव लपवू कशी?

गेला तू ज्या दिवशी दूर
होते मी किती मजबूर
प्रयत्न तर केले फार
पण नाही आले मनातले ओठावर

झाले आता इतके अंतर
दिसेना रस्ता आपल्या मध्यंतर
कसा विसरला आपली ती दुनिया
जेथे होते प्रेम निरंतर

संपला स्वप्नांचा लपंडाव
आता उरले फक्त मनावर घाव
पुकारून तुला थकले आता
थकले घेऊन तुझ्याकडे धाव

राहिले अबोध जाणून जरी
प्रेमाची भाषा न समझे परी
प्राणही तुझ्यावर ओवाळून टाकले
मन हे माझे तुझ्यात गुंतले

---परिणीता (२७/७/२००९)

तो तू नव्हे

जो माझ्यावर प्रेम करायचा
जो सतत भेटायास यायचा
जो हट्टाने माझी मनीषा ओळखायचा
तो तू नव्हे, तो तू नव्हे

रात्रभर जागून माझ्याशी बोलणे
काम विसरून मला स्मरणे
वेड्यागत त्या गोष्टी परत दे रे
का दर्शते आता, तो तू नव्हे?

दुरून माझ्या भेटीस येणे
उशिरा पर्यंत माझ्यासह असणे
आणि मित्रांशी ते खोटे बोलणे
का जाणवते आता , तो तू नव्हे?

पाहिली होती तासंतास वात कधी
केली होती थट्टा रागाची
मग पुसुनी डोळ्यातील पाणी
का वाटते आता, तो तू नव्हे?

कुंपणाच्या आड तुझे लपणे
मग हळूच येऊन डोळे मिटणे
अन गुलाबाचे फुल हाती देणे
का वाटते आता, तो तू नव्हे?

एकांत बसुनी गाणे म्हणणे
माझे हात तुझ्या हाती घेणे
चांदण्यात तुझे-माझे फिरणे
का असे दिसते आता, तो तू नव्हे?

झाले तुझे जाणे असे
विसरावे लागले येणे तुझे
जो गेला तोच सत्य आहे
ज्यास पहिले सहवासात , तो तू नव्हे.

---परिणीता (१४/८/२००९)

तशी ती

तिला  पाहुनी वाटे असे
 शब्दांत व्यक्त करू कसे ?
 तिची आठवण हृदयी राहुनी
शब्दावाचून स्पंधान करी जसे

अनेकदा पाहिलं तिच्या डोळयांत
काही शांत होते नेहमी
अबोल नाहीत नयन तिझे
तरीही अपरिचित राहिलो मी

कित्येकदा तिझे बोल कानावर पडले
कारुण्य तिझ्या बोलीत होते
फुलांच्या कोमलतेने ती बोले
हळुवार शब्द  ओठातुनी पडे

कधी झाला स्पर्श तिचा
सर - सारी होती सर्वांगी
मिठीत होती त्या दिवशी
आता आहे विरह माझ्या संगी

दोन साळुंख्या पाहताच खुश होणे
अन तारखांशी इच्छा मागणे
विसरलो नाही आजवरही
केले मी मनाशी किती बहाणे

वेळ माझी चुकली होती
तिला दुखावून आता दुखलो मी
प्रेम फार होता तिच्यावर
पण तिला नसमझता राहिलो मी.

---परिणीता (३१/७/२००९)