आज पाहताच तुला
आठवले परत ते दिवस
मनाच्या झर्याला पाणी लाभो
असा झाला प्रेमाचा पाऊस
नाहीं किती आहे मानस आवरणे
तू समोर असता, तुला न पाहणे
पण नजर माझी चोरटी ठरली
जपत, लपत तुला पाहत राहिली
नेते दिवस गेले कसे?
मिठीत माझ्या आला नाही
प्रयत्न फार केले परी
जवळ तू आला नाही
शब्दांचा खेळ मांडू पाहावे
चित्तच नव्हते थारा
सरळ जरी म्हणावे वाटले
साहस नव्हता आधारा
हताश होऊन क्षितिज पाहिले
सूर्य मावळतीला होता
प्रेम व्यक्त करण्या करिता
तेव्हा तुला कंठ फुटला होता !!!
-----परिणीता (०७/०२/२०१०)