Wednesday, April 28, 2021

बालपणी

तुझी माझी कट्टी आणि क्षणात झालेली बट्टी 

कोपऱ्यात मांडलेली भातुकली, सांग तुला हि आठवतात का?

हाती हात धरून खेळले, फुगडी आणि झिम्मा नाचले 

सागरगोटे आणि काचा वेचले, सांग तुला हि आठवतात का?


आठवणी...  आंब्या नि जांभळाची 

दगड मारुनी पडण्याची 

पावसाळी चिंब भिजण्याची 

पहाटे थंडीत फिरण्याची 

लगोरीचा डाव असो व लपाछुपीचा आडोसा

लगबगीत लागलेल्या जखमेची 

बालपणीचे दिवस आज हि हसवतात का?


गणिताच्या पाढ्यात  

आणि शब्दांच्या माऱ्यात 

तुझ्या हाती मारलेली छडी 

आज हि डोळे भिजवतात ना...  


सांग कधी आठवते का बालपणातील ताई?

जी कडक शीस्त लावी

पण तिच्या डोळा हि पाणी येई 

आज हि तिच्या वर रागावतेस का

आणि क्षणात विसरुनि जातेस का?

जरी अबोला असतो दिवसेंदिवस 

तरीही मनात प्रेम दरवळत का?


----परिणिता (२७/०४/२०२१)