Wednesday, March 17, 2021

चांद रात



आभाळी चंद्राचा प्रकाश 

    उजळी रात्र चांदण्यांचा आभास 

चांदण्यात अशी येशील ना 

    रातराणी परी हळूच फुलशील ना. 


पहाया वाट, बसतो मी 

    लपत-छपत येईल ती 

चांदण्यात लपता-लपवताना 

    पैंजण पायात वाजतील ना. 


तिच्या सह येई राग ही 

    आणि पाहताच तिला हसे मन 

मस्करी करत हसताना 

    कान माझा ओढशील ना 


गार वाऱ्यात उडता गंध 

    जसा ताऱ्यांत मग्न चांद 

अशा वार्यात पदर उडताना 

    हळूच त्याला सावरशील ना 


प्रहारा मागे प्रहर जाई 

    जाण्याचीही वेळ येई 

जाताना मिठीत घेशील ना 

    आणि उद्या परत येशील ना. 


--परिणीता (२३/१०/२००९)


No comments:

Post a Comment