Wednesday, December 23, 2020

कदाचित!

 आयुष्यात येति काही व्यक्ती  

स्मरणी त्या सतत राहती 

काहिक जसे क्षण हराप्ती 

चत्त अन मन म्हणत राहती, कदाचित!


पाहिले तिला ज्या क्षणी,

हजार सितार वाजू लागल्या मनी 

जमीन जणू हादरली तेव्हा 

वाटले हीच माझी स्वप्नराणी 

पण पाऊल सुद्धा होते भीतीत 

आणि मन म्हणाले, कदाचित!


ती पहिली भेट आमची 

सायंकाळी ढळता सूर्य आणि 

धीट मानाने निर्णय करुनि 

मग वाटले टाळावे मानाचे हे गीत 

अन मन म्हणत राहिले, कदाचित!


भेटायला गेलो तिच्या घरी 

केली ओळख तिच्या आई-बाबांशी 

मग होती त्याची बारी 

अनपेक्षित होती बातमी जरी 

ठरले विसरावे तिला आणि तिची प्रीत 

तरी हि मन म्हणाले, कदाचित!


कसला आयुष्य आता, संपले आता खेळ 

हूर-हूर सतत असते, का चुकवली मी वेळ?

हवे ते निसटून जाते असेच का नेहमी घडते?

असेल हीच जगाची रीत,

कदाचित! कदाचित!! 


---परिणीता  (०८/०९/२००९)



No comments:

Post a Comment