Wednesday, December 23, 2020

कदाचित!

 आयुष्यात येति काही व्यक्ती  

स्मरणी त्या सतत राहती 

काहिक जसे क्षण हराप्ती 

चत्त अन मन म्हणत राहती, कदाचित!


पाहिले तिला ज्या क्षणी,

हजार सितार वाजू लागल्या मनी 

जमीन जणू हादरली तेव्हा 

वाटले हीच माझी स्वप्नराणी 

पण पाऊल सुद्धा होते भीतीत 

आणि मन म्हणाले, कदाचित!


ती पहिली भेट आमची 

सायंकाळी ढळता सूर्य आणि 

धीट मानाने निर्णय करुनि 

मग वाटले टाळावे मानाचे हे गीत 

अन मन म्हणत राहिले, कदाचित!


भेटायला गेलो तिच्या घरी 

केली ओळख तिच्या आई-बाबांशी 

मग होती त्याची बारी 

अनपेक्षित होती बातमी जरी 

ठरले विसरावे तिला आणि तिची प्रीत 

तरी हि मन म्हणाले, कदाचित!


कसला आयुष्य आता, संपले आता खेळ 

हूर-हूर सतत असते, का चुकवली मी वेळ?

हवे ते निसटून जाते असेच का नेहमी घडते?

असेल हीच जगाची रीत,

कदाचित! कदाचित!! 


---परिणीता  (०८/०९/२००९)



Friday, December 4, 2020

हि दुनिया रास आली नाही

मोह नाही कसला

अन आवड नाही कशाची 

मन व्याकुळ आहे तरी 

हि दुनिया रास आली नाही 


माणिक आणि मोती, धन आणि दागिणे 

लोभ नसावा यांचा, आहे हे मागणे,

मनाचे हे सतत सांगणे 

असुनी सारे, काही हि नाही 

हि दुनिया रास आली नाही 


सुख घर-दाराचे, आशीर्वाद आई-बाबांचे 

प्रेम भाऊ बहिणींचे, संगती सखींचे

तरी हि स्वप्न उडण्याचे 

हे मन शोधात राही

हि दुनिया रास आली नाही 


करुनि रोज चाकरी, कमवावी मीठ-भाकरी 

अनेकदा वाटे सोडूनि द्यावी बिगारी

स्वप्नांचे डोंगर वाटे भारी 

जावे दूर सोडूनि सारे 

हि दुनिया रास आली नाही 


सुखाच्या शोधात झाले वेडी 

शांतता मनाची गमावून बसली 

दे रे देवा मुक्ती या पासूनि 

कित्येक प्रयत्न केले परी 

हि दुनिया रास  नाही. 


---परिणीता (२१/०८/२००९)






दिवस कधी असे येति

 दिवस कधी असे येति

विसरुन सर्व त्रास जाती 

शांतता लाभे चित्ती 

मने ज्यांची आतुरतेने वाट पाहती


नसावा चाकोरीचा त्रास अति 

सुट्टी असावी मना जोगी 

कामाचीही कट-कट नाही 

नाही रोजच्या प्रवासाची 

दिवस कधी असे येति. 


मना सारखे बगाडावे नेहमी 

नाही चिंता अभ्यासाची 

स्वप्नी पाहिलेले प्रश्नच परीक्षेत असावीत

आणि सर्वेच पास, अपयशी कुणी नाही 

दिवस कधी असे येति.


आनंद असे जेव्हा स्वयंपाक नाही 

क्षणात होतील धुणी-भांडी 

घरची केर निघे चुटकीशी 

आणि भरपूर वेळ मिळे T.V. पाशी 

दिवस कधी असे येति.


दिवस कधी असे येति 

जेव्हा सर्व इच्छा पूर्ण होती 

नसणार डोळ्यात पाणी 

नसणार मनास पिढा त्यांची 

जे नाही सोबती 

अशा दिवसाची इच्छा जपावी मनापाशी 


---परिणीता (२८/०७/२००९)


 

प्रीत

कशी सांगू मी हे तुझ, किती प्रेम आहे मनात 

चंद्राचा आहे तारकांशी, नाही निळाई हि इतकी समुद्रात


चकोरास तशी लागली मनास ओढ 

मनात अनेक भावना अबोल 


प्रहरात रात्र सारे जशी, मनात प्रीत उमले तशी 

गंध जसा पसरे तिमिरी, फुले रात-राणी जशी 


एकांत वास, एकांत रात,

एकांत भावात, घालते हाक


मन हे माझे भोळे-भाबडे,

सतत असे तुझ्याच नाद


त्या चालल्या पाऊलवाटा,

परतात या कधी?


एकटे हे दिवस माझे,

तुझ्या वीण सारतात या कधी?


----परिणीता (१०/०१/२००९)

Friends of Mine

Like lamp in the dark

Like shadow in the summer

Like river in desert

You were with me ever.


Like pole star in the night

Like ray of light

Like compass to ship

You showed me the way right.


Like lightening to thunder 

Like seed to mead

Like bud to flower

My life is where always you lead.


Like flower & fragrance

Like diamond & shine

Like moon & moonlight 

Be ever friend of mine.


----Parinita (11/10/2004) 

 

 

 

 

 

 

 

 


Sunday, February 1, 2015

आठवण

आलं हसू गालावरी, घेउनि तुला माझ्या मनी.
अनेक विचार आले, आल्या अनेक ओळी. 
तुझ्या संगे आल्या आठवणींच्या श्रावण सारी. 

किती उपमा मांडल्या. अन केले प्रयत्न फार. 
पण कुठलीच गोष्ट आवडेना तर घ्यावं कुणाचं आधार?
फुलांपासून चंद्रा पर्यंत, सगळेच आहेत चर्चेत
मग म्हणावं कुणा? कोण सांगेल हे भेद?

स्वतःशीच अनेक गप्पा रमल्या
मग स्वतः तुझ सह रमले. 
"त्या दिवशी अन त्या वेळी …." 
असे आठवत तुला हि भेटले
काही गोड तर काही तिखट
तर काही नवीन विचार हि जुळले
तुझ्या नावानं, माझ्या सोबत,
हे सारे खेळू लागले. 

कधी तू असा. तर कधी तू तसा. 
कधी तू अल्लद, तर आधी हळुवा. 
कधी तुझं हट्ट मग क्षणात थट्टा 
कधी तुझ्या रागाच्या रंगबिरंगी छटा 
सगळे ते रंग दिसले खुलून
माझ्या चेहऱ्यावर पण आले फुलून
प्रत्येक ते क्षण आठवणींतले
जणू मनातलं गुलमोहर रे! 

------परिणीता (०६/०७/२०१०)

Sea and Sun

Floating clouds in the sky,
& boats sailing in the sea.
Birds flying back to home
& sun setting slowly.

Footsteps on the sand
wend long long way
imprints were mortal
on waves washed away.

Waves rushing to shores
trying to grab sand.
unaware of the fact
sand doesnot remain in its hand.

------Parinita (16/04/2006)