Sunday, April 6, 2014

प्रिय तू

रोज सुर्य ढळता मनास पुसे,
का आहे काही तरी असे?
ज्यास न विसरता येई
अन करू काबुल कसे?

आज हा दिवस का आला,
जेव्हा तू नाही जवळ?
का नेहमी असे घडते?
का आहे हे सत्य अटळ ?

का नियती असे कट मांडते?
जे अत्यंत हवे असते,
तिच नेमकी दूर होते,
परत न येण्यासाठी, हरवून जाते. 

जिवलग होता तू माझा 
प्रेमात होते मी तुझ्त्या 
तरी हि का तू गेला?
इतका कसा निष्ठुर झाला?

अश्रू आता थांबले वाहूनी.
मी स्वतःशी प्रश्न विचारूनी,
कधी तू येशील परत?
आज हि बसेन तुझ्या वाटे वर जाऊनी. 

काही नाही जेथे, तिथे का अशा लावली मी?
तू कधी हि नाही परतणार हे आहे जाणुनी 
रडणं आता जमत नाही, हसणं हि विसरले मी 
तुझ्या नादी लागूनी स्वतःची वाट विसरले मी. 

तरीहि रोज हे मागणे 
कसे तरी, तुला परत आणणे
कधी तरी भेटुनी,
मनातले तुला सांगणे,

आज आहे एक वाधळ मनात परत 
आहे तू कि तुझी आठवण परत?
का नाही तू जात इथुनी?
आणि का नाही माझा त्रास संपत?

---परिणीता (८/८/२००९)

प्रवास

वारा वाहे चाहूल लागे
कुणी तरी येते असे वाटे
वळून पहिले पण कुणीही नव्हतं
मनास भास लपंडाव खेळलतं

काही पाऊले पुढे पडली
पुन्हा वळून पाहावे असे वाटले
वळत-वळत पाऊले चालली
वाट कधी सरकली, नाही कळले

वाटेवरच्या पाऊलखुणा शोधावे
जे गेले त्यांचे अस्तित्व आठवावे
बसुनी जरा पाहावे वाटले
पण त्या खुणा नाहीश्या झाल्या

वाटेवर चालताना थोडे थांबून
त्यांच्या दिशेने पहिले जाऊन
मनास भय होते काही
कुणी नव्हते जरी पहिले शोधून

पुन्हा चालावी ती वाट
पण नाही आता कुनाची साथ
एकटे पाऊल, ओझे मनात
वाटे असता जर कुणाचा हाथ

पाऊलाला पाऊल टाकत निघाले
स्मरण त्याला करीत गेले
वाट अशी हि सरकत जाई
प्रवास असा हा पुढे जाई

---परिणीता (४/८/२००९)  

हस जरा

हस रे हस, हस रे जरा,
ओठांवर तुझ्या फुटूदे हसू जरा.
विसारुदे दुखः, विसर विदना साऱ्या,
येउदे हास्य मुखावर, अरे हस रे जरा

का रे असा हट्ट तुझा?
ऐकना आता काही मला
नको जाऊ दूर असा
मी पण आहेना साथ तुझ्या
आळी-मिळी पुरे आता
विसरुनी राग जरा
हस रे, हस जरा.

काय सांगू तुला आता,
किती आवडतो तू मला,
तसाच आहे हास्य तुझा
अमावस्यात टपोरं चांदणं जसा
गालावरची लाली उडुदे काही जरा
हसुचं पाखरू घेऊदे झेप जरा
आता तरी हस जरा.

किती करू विनवणी तुला
हे बघ, पकडले कान हि आता,
माफ कर मला, बघ इथे जरा
गालांचा फुगा फुटेल का आता?
डोळ्यांत हसू दिसले कि मला
खोटा आहे हा राग तुझा
आता तू हसलास जरा

कळली मला तुझी हि थट्टा
पुरे झाला हा खेळ आता
निघाले मी पाह आता,
नाही विसरला जर तू राग तुझा
येणार नाही उद्या भेटीला तुझ्या
सोड हा राग आणि मिठीत ये माझ्या
हसलासना ? हो हसला तू आता…

---परिणीता (२७/७/२००९)

एका घराची गोष्ट

तुझ्या-माझ्या घराला घरपण,
घर समोर एक आंगण,
अंगणाच्या चांदण्यात बसणारे ते क्षण,
एका घराच्या गोष्टीत, दोघे आपण.

घराला असणार खिडक्या चार,
स्वप्नांच्या घराला प्रेमाचं दार.
आनंदाचं छत आणि प्रत्येक क्षण
एका घराच्या गोष्टीत, दोघे आपण.

घराच्या कोपर्यात स्वयंपाकघर,
तव्यात भाकरी असेल चुलीवर,
तुझ्या संगे भाकरी खाणं, अन
एका घराच्या गोष्टीत, दोघे आपण.

आवारात असतील फुले व झाडे,
पानांतून डोकाणारी असतील फळे,
अशी बाग जपायला असेल कुंपण
एका घराच्या गोष्टीत, दोघे आपण.

देवघराची घंटा जशीच वाजेल,
सकाळ-सायंकाळ तिथं आरती असेल,
भक्ती - भावात तृप्त मन
एका घराच्या गोष्टीत, दोघे आपण.

घरामाघे गोठा आणि गोठ्यात गाय,
गाईचं दूध आणि दुधाची साय,
सोबत असतील वासरे पण
एका घराच्या गोष्टीत, दोघे आपण.

घरातील खास एक आपली खोली,
खोलीत फक्त प्रेमाची बोली,
प्रेमात पडलेलो आपण,
एका घराच्या गोष्टीत, दोघे आपण.

स्वप्नांहून सुंदर, असे आपले घर
खराज असे केले तर
पिढ्यान-पिढी काढतील आठवण,
एका घराच्या गोष्टीत, दोघे आपण.

---परिणीता (२/९/२००९)

एडमायरेशन

विस्मारुनी तुला, आज हे लिहिते
दुरूनच रोज तुला पाहते
स्वप्नांच्या जगात तुला भेटते
खरोखर तुला भेटता येईल का?

कोवळे हसू, तल्लख तेजात
साधी वृत्ती, झळके डोळ्यांत
मोठे व्यक्तीमत्व, सध्या झब्ब्यात
असे कुणी रोज भेटत नसतात

चार शब्दांची त्याची कविता
मन हेरावून घेई ऐकता
सुंदर ओळींत भाव आणणे
अगतिक होऊन डोळ्यांचे मिटणे.

वेगळा व्यक्तिमत्व, वेगळीच व्यक्ती
अनेकांचा आवडता, अनेकांची प्रीती,
त्यातील माझे स्वप्न आणि मी,
कधी तरी, कुठे तरी होतील भेटी - गाठी

जसे कवितेत भाव सहज मिसळतोस
जसे मनाचे वाचून सांगतोस
तसाच माझ्या मनाला जाणशील का?
कधी तरी अबोल मनीषा ओळखशील का?

---- परिणीता (११/१०/२००९)

Your Eyes

They talk, they smile,
They lower, they rise,
They show emotions,
They totally mesmerize.

With intelligence they shine.
They show your love divine.
I see them & know that you are mine.

They are bed of love
Where I want to die.
They are sky of peace
Where I want to fly.

I want to say, I feel so nice.
Whenever I see in your eyes….


---------parinita (27/7/2007)

Why in the World?

Why in the world do we come?
And have relations which stay no long.
Where lots of sorrows & joys are some
And the burden of it we carry along.

Why for others do we care?
When there are lots of betrayals & things unfair.

Why for our company we make a friend?
When there are pains at its end.

Why in our life do we love?
When our dreams scatter with a blow.

Why in this world do we have life?
As we know we won’t live forever.
And the death is always waiting for us
To take us away from everyone forever.

To  love or care someone
There may not be any reason.
It is an emotion & affection
Not just a mere attraction.
No one can give reason
Why do we do it always & again?
Because it is done by heart
And never by our brain.

----parinita(03/10/2004)