वारा वाहे चाहूल लागे
कुणी तरी येते असे वाटे
वळून पहिले पण कुणीही नव्हतं
मनास भास लपंडाव खेळलतं
काही पाऊले पुढे पडली
पुन्हा वळून पाहावे असे वाटले
वळत-वळत पाऊले चालली
वाट कधी सरकली, नाही कळले
वाटेवरच्या पाऊलखुणा शोधावे
जे गेले त्यांचे अस्तित्व आठवावे
बसुनी जरा पाहावे वाटले
पण त्या खुणा नाहीश्या झाल्या
वाटेवर चालताना थोडे थांबून
त्यांच्या दिशेने पहिले जाऊन
मनास भय होते काही
कुणी नव्हते जरी पहिले शोधून
पुन्हा चालावी ती वाट
पण नाही आता कुनाची साथ
एकटे पाऊल, ओझे मनात
वाटे असता जर कुणाचा हाथ
पाऊलाला पाऊल टाकत निघाले
स्मरण त्याला करीत गेले
वाट अशी हि सरकत जाई
प्रवास असा हा पुढे जाई
---परिणीता (४/८/२००९)
कुणी तरी येते असे वाटे
वळून पहिले पण कुणीही नव्हतं
मनास भास लपंडाव खेळलतं
काही पाऊले पुढे पडली
पुन्हा वळून पाहावे असे वाटले
वळत-वळत पाऊले चालली
वाट कधी सरकली, नाही कळले
वाटेवरच्या पाऊलखुणा शोधावे
जे गेले त्यांचे अस्तित्व आठवावे
बसुनी जरा पाहावे वाटले
पण त्या खुणा नाहीश्या झाल्या
वाटेवर चालताना थोडे थांबून
त्यांच्या दिशेने पहिले जाऊन
मनास भय होते काही
कुणी नव्हते जरी पहिले शोधून
पुन्हा चालावी ती वाट
पण नाही आता कुनाची साथ
एकटे पाऊल, ओझे मनात
वाटे असता जर कुणाचा हाथ
पाऊलाला पाऊल टाकत निघाले
स्मरण त्याला करीत गेले
वाट अशी हि सरकत जाई
प्रवास असा हा पुढे जाई
---परिणीता (४/८/२००९)
No comments:
Post a Comment