आलं हसू गालावरी, घेउनि तुला माझ्या मनी.
अनेक विचार आले, आल्या अनेक ओळी.
तुझ्या संगे आल्या आठवणींच्या श्रावण सारी.
किती उपमा मांडल्या. अन केले प्रयत्न फार.
पण कुठलीच गोष्ट आवडेना तर घ्यावं कुणाचं आधार?
फुलांपासून चंद्रा पर्यंत, सगळेच आहेत चर्चेत
मग म्हणावं कुणा? कोण सांगेल हे भेद?
स्वतःशीच अनेक गप्पा रमल्या
मग स्वतः तुझ सह रमले.
"त्या दिवशी अन त्या वेळी …."
असे आठवत तुला हि भेटले
काही गोड तर काही तिखट
तर काही नवीन विचार हि जुळले
तुझ्या नावानं, माझ्या सोबत,
हे सारे खेळू लागले.
कधी तू असा. तर कधी तू तसा.
कधी तू अल्लद, तर आधी हळुवा.
कधी तुझं हट्ट मग क्षणात थट्टा
कधी तुझ्या रागाच्या रंगबिरंगी छटा
सगळे ते रंग दिसले खुलून
माझ्या चेहऱ्यावर पण आले फुलून
प्रत्येक ते क्षण आठवणींतले
जणू मनातलं गुलमोहर रे!
------परिणीता (०६/०७/२०१०)