Wednesday, December 23, 2020

How can?

How can someone be loved so much?

& how the feelings be revealed as such

no matter how long it might be

I'll be waiting for that touch.


The day when you'll be here

I will always wish for that day

A day when you'll know, my dear

The day when even you'll say


I want a moment with you, lonely

when I will see your face lovely

the person whom I had loved always

is with me after so many days


How can anyone be known of

The felling that is so strong

how shall I say it to you

Please don't take me wrong


With you, my life is beautiful

It seems so purposeful

I won't wish to leave you ever

Not even in my dreams, never!


But I am still holding my heart

full of love, waiting for you.

when I will come to you & say it

Will you reply "me too..!"


---Parinita (23/10/2009) 

असता-नसता

 रात्री, डोळे मिटताना 

दिवस दिसती तू असताना 

माझा रुसवा आणि प्रेम तुझा 

का नाही माझ समझले, तू असताना 


कसे विसरणार, तुझा जिव्हाळा 

सतत तुझे सांगणे मला 

किती तुझं काळजी करणं 

आणि त्यावर हि माझे अविश्वास असणं  

आता हि वाटे तू नसताना 


असे काही नते जोडले होते 

तुह्या विना राहावले नसते 

पण केला मीच तेव्हा अंतर 

कसे जुळतील पुन्हा, ती तुटल्या नंतर?

काशी मी निष्ठुर झाले तोडताना 


रोजची सवय तुझी 

नकळत आवड झाली अशी 

वाटले नव्हते असे वाटेल 

तो गेल्या नंतर हि आठवेल 

पण हे कळले नाही जाताना 


कशी असते रात्र विरहाची 

आठवण असे फक्त त्याची 

डोळ्यात पाणी नसेल तरी हि 

मानस ओढ असते त्याची 

भासतो तू जरी हि नसताना 


हट्टी मन आहे माझे 

कसे याला समझवायचे 

आज हि तुझी वाट पाहतो 

आज हि तुला प्रेम करतो 

जे काळे नि वळले नसताना 

ते का समझले नाही तू असताना?


--परिणीता  (२३/१०/२००९)


स्वप्न

 तुला पाहते रोजच स्वप्नी 

तुला आठवते प्रत्येक क्षणी 

आयुष्याचे स्वप्न काय असते 

नसून आता हे मला दिसते 


आठवत तुझ, येति ते दिवस हि 

जेव्हा फुलांचा गंध दरवाळलेला मनी 

धरुनी तुझा हात, घेऊनि तुझा साथ 

चालल्या जेव्हा त्या चंदण राती 


पाहुनी चंद्रास भासे तूच 

नसतानाही काही, चाहूल का लगे 

मग मिटुनी डोळे हरवून पुन्हा 

नयनी तुझीच मिठी भासे 


सुखणारा असा स्पर्श तुझा 

मनी फुलवा मोहर जसा 

नात्यातील ओलावा उडुनी गेला 

आठवणींचा सदा तरीही झाला 


पुन्हा मिटले मी डोळे 

आलास तू जवळ 

पण काही केल्या तू येणार नाही 

आहे तू स्वप्न केवळ... 


---परिणीता (२८/११/२००९)

कदाचित!

 आयुष्यात येति काही व्यक्ती  

स्मरणी त्या सतत राहती 

काहिक जसे क्षण हराप्ती 

चत्त अन मन म्हणत राहती, कदाचित!


पाहिले तिला ज्या क्षणी,

हजार सितार वाजू लागल्या मनी 

जमीन जणू हादरली तेव्हा 

वाटले हीच माझी स्वप्नराणी 

पण पाऊल सुद्धा होते भीतीत 

आणि मन म्हणाले, कदाचित!


ती पहिली भेट आमची 

सायंकाळी ढळता सूर्य आणि 

धीट मानाने निर्णय करुनि 

मग वाटले टाळावे मानाचे हे गीत 

अन मन म्हणत राहिले, कदाचित!


भेटायला गेलो तिच्या घरी 

केली ओळख तिच्या आई-बाबांशी 

मग होती त्याची बारी 

अनपेक्षित होती बातमी जरी 

ठरले विसरावे तिला आणि तिची प्रीत 

तरी हि मन म्हणाले, कदाचित!


कसला आयुष्य आता, संपले आता खेळ 

हूर-हूर सतत असते, का चुकवली मी वेळ?

हवे ते निसटून जाते असेच का नेहमी घडते?

असेल हीच जगाची रीत,

कदाचित! कदाचित!! 


---परिणीता  (०८/०९/२००९)



Friday, December 4, 2020

हि दुनिया रास आली नाही

मोह नाही कसला

अन आवड नाही कशाची 

मन व्याकुळ आहे तरी 

हि दुनिया रास आली नाही 


माणिक आणि मोती, धन आणि दागिणे 

लोभ नसावा यांचा, आहे हे मागणे,

मनाचे हे सतत सांगणे 

असुनी सारे, काही हि नाही 

हि दुनिया रास आली नाही 


सुख घर-दाराचे, आशीर्वाद आई-बाबांचे 

प्रेम भाऊ बहिणींचे, संगती सखींचे

तरी हि स्वप्न उडण्याचे 

हे मन शोधात राही

हि दुनिया रास आली नाही 


करुनि रोज चाकरी, कमवावी मीठ-भाकरी 

अनेकदा वाटे सोडूनि द्यावी बिगारी

स्वप्नांचे डोंगर वाटे भारी 

जावे दूर सोडूनि सारे 

हि दुनिया रास आली नाही 


सुखाच्या शोधात झाले वेडी 

शांतता मनाची गमावून बसली 

दे रे देवा मुक्ती या पासूनि 

कित्येक प्रयत्न केले परी 

हि दुनिया रास  नाही. 


---परिणीता (२१/०८/२००९)






दिवस कधी असे येति

 दिवस कधी असे येति

विसरुन सर्व त्रास जाती 

शांतता लाभे चित्ती 

मने ज्यांची आतुरतेने वाट पाहती


नसावा चाकोरीचा त्रास अति 

सुट्टी असावी मना जोगी 

कामाचीही कट-कट नाही 

नाही रोजच्या प्रवासाची 

दिवस कधी असे येति. 


मना सारखे बगाडावे नेहमी 

नाही चिंता अभ्यासाची 

स्वप्नी पाहिलेले प्रश्नच परीक्षेत असावीत

आणि सर्वेच पास, अपयशी कुणी नाही 

दिवस कधी असे येति.


आनंद असे जेव्हा स्वयंपाक नाही 

क्षणात होतील धुणी-भांडी 

घरची केर निघे चुटकीशी 

आणि भरपूर वेळ मिळे T.V. पाशी 

दिवस कधी असे येति.


दिवस कधी असे येति 

जेव्हा सर्व इच्छा पूर्ण होती 

नसणार डोळ्यात पाणी 

नसणार मनास पिढा त्यांची 

जे नाही सोबती 

अशा दिवसाची इच्छा जपावी मनापाशी 


---परिणीता (२८/०७/२००९)


 

प्रीत

कशी सांगू मी हे तुझ, किती प्रेम आहे मनात 

चंद्राचा आहे तारकांशी, नाही निळाई हि इतकी समुद्रात


चकोरास तशी लागली मनास ओढ 

मनात अनेक भावना अबोल 


प्रहरात रात्र सारे जशी, मनात प्रीत उमले तशी 

गंध जसा पसरे तिमिरी, फुले रात-राणी जशी 


एकांत वास, एकांत रात,

एकांत भावात, घालते हाक


मन हे माझे भोळे-भाबडे,

सतत असे तुझ्याच नाद


त्या चालल्या पाऊलवाटा,

परतात या कधी?


एकटे हे दिवस माझे,

तुझ्या वीण सारतात या कधी?


----परिणीता (१०/०१/२००९)